scorecardresearch

पुणे: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून केला अन्…; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

या दोघांचं लग्न सात वर्षांपूर्वी झालं होतं.

Interfaith Relationship Muslim Young Man Murder Hindu Girl Father Will Face Probe
(प्रातिनिधीक छायाचित्र)

महिलेचा पतीने चारित्र्याच्या संशयातून गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. पुण्यातील मंतरवाडी भागात ही घटना घडली आहे. विद्या राहुल फडतरे असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर आरोप राहुल फडतरे असे पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल आणि मयत विद्या यांच्या लग्नाला ७ वर्ष झाली होती. आरोपी राहुल हा ड्रायव्हर म्हणून काम करायचा, पण राहुल हा पत्नी विद्या हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत भांडण करायचा, असंच भांडण त्या दोघांमध्ये पुन्हा झालं. त्या भांडणात संतापलेल्या राहुलने पत्नी विद्याचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर तो मृतदेह कात्रज बायपास रोडवर साडीमध्ये गुंडाळून टाकून दिला.

पत्नीला मारल्यानंतर कोणाला त्याच्यावर कोणाचा संशय येऊ नये, म्हणून मृतदेह कात्रज बायपासवर असल्याचे सांगितले. पण राहुलकडे चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी राहुल फडतरे याला अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याचे लोणी काळभोर पोलिसानी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man killed wife in pune over suspecting on character svk 88 hrc

ताज्या बातम्या