लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : विद्यापीठात प्राध्यापक असल्याच्या बतावणीने युवतीचा विनयभंग केल्याची घटना गणेशखिंड रस्त्यावर घडली. या प्रकरणी केतन कुलकर्णी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

AMU gets its first woman VC Naima Khatoon
व्यक्तिवेध : नईमा खातून
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

आणखी वाचा-पुणे: सातारा रस्त्यावर तरुणावर शस्त्राने वार केल्याची घटना, सराईत गुन्हेगारासह साथीदार अटकेत

या बाबत एका तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी पीएमपी बसमधून गणेशखिंड रस्त्यावर उतरली. आचार्य आनंदऋषीजी चौकातून (विद्यापीठ चौक) ती रात्री आठच्या सुमारास विद्यापीठात निघाली होती. रस्ता ओलांडणाऱ्या तरुणीला कुलकर्णीने अडवले. विद्यापीठात प्राध्यापक असल्याचे त्याने तिला सांगितले. कुलकर्णीने तिला मोबाइल क्रमांक दिला. त्यानंतर कुलकर्णीने तिच्याशी असभ्य वर्तन केले. घाबरलेल्या तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.