मराठी वाङ्मयातील सर्व प्रवाहांचे खुल्या मनाने स्वागत करणारे ज्येष्ठ समीक्षक-कवी, माजी संमेलनाध्यक्ष आणि साधना ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. रावसाहेब गणपतराव ऊर्फ रा. ग. जाधव (८३) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी पहाटे निधन झाले. प्रा. जाधव यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अन्त्यसंस्कार करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवार पेठेतील अमेय अपार्टमेंट येथे गेल्या १५ वर्षांपासून जाधव यांचे वास्तव्य होते. सहा महिन्यांपूर्वी घरामध्ये पाय घसरून जाधव पडले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती नाजूक झाली होती. तीन महिन्यांपूर्वी सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी प्रा. रा. ग. जाधव यांना घरी येऊन िवदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला होता. त्यानंतर सव्वा महिन्यांपूर्वी त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वार्धक्यामुळे प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना दहा दिवसांपूर्वी घरी आणण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची हालचाल मंदावली होती. अखेरीस शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi literary critic r g jadhav passes away
First published on: 28-05-2016 at 03:22 IST