मोशी येथील किसान कृषी प्रदर्शनास बुधवारी मोठय़ा दिमाखात प्रारंभ झाला. चीन, तैवान, कोरिया, लेबनन, रशिया येथून ४२ कंपन्यांचा सहभाग हे या वर्षीच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले आहे.
जालना, बुलढाणा, शेगाव, लातूर, औरंगाबाद, इंदूर येथील शेतकऱ्यांच्या गटांच्या हस्ते ढोलताशांच्या गजरात कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. येत्या १४ डिसेंबपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. विविध प्रकारची फुलशेती, हरितगृहे, दुग्ध व्यवसाय, फळप्रक्रिया आदींविषयी मार्गदर्शन करणारे दालन प्रदर्शनात आहेत. आंतरराष्ट्रीय दालन १० ते १२ डिसेंबपर्यंत सर्वासाठी खुले राहणार आहे. आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी उपयुक्त ठरणारी अनेक यंत्रे आणि अवजारे, त्याचप्रमाणे शेतकामासाठी खास बनावटीची छोटी उपकरणे शेतकऱ्यांना प्रदर्शनामध्ये पहायला मिळते. राज्यशासनाच्या कृषी विभागाच्या दालनात ३ किलोचा कोबी, फ्लॉवर, बांध्यावर लागवड केलेला २० किलोचा कोहळा, चिंबळी गावातील केळी आदींचा समावेश आहे.