पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे आईने मुलीची हत्या करुन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  बुधवारी सकाळी साडे सातच्या सुमारास ही घटना घडली. कोमदी असे मृत महिलेचे नाव असून तिच्या देवेश्री असे चिमुकल्या मुलीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीमधील इंद्रायणी नगर येथे निरवान या वसाहतीमध्ये पहिल्या मजल्यावर राहत असलेल्या आईने पाच वर्षांच्या मुलीची हत्या करुन स्वत: गळफास लावून घेत आपले आयुष्य संपवले. कोमदी (वय २५)  आणि देवेश्री (वय ५) अशी या माय लेकींची नावे आहेत. गेल्या दहा वर्षापासून ही महिला पतीसोबत निरवान वसाहतीमध्ये राहत होती.  मयत महिलेचा पती इरसपल याच्या पिंपरी-चिंचवड परिसरात दोन कंपन्या आहेत. त्यांच्या कंपनीत नातेवाईकांची मुले देखील कामाला असून ते देखील याच इमारतीत राहतात. आज सकाळी इरसपलची बहीण भाजी मागण्यासाठी कोमदी हिच्याकडे आली. मात्र, आतमधून कोणीही प्रतिसाद दिला नाही. बराच वेळ आवाज देऊन प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला त्यावेळी ही घटना उघडकीस आली. यावेळी पती इरसपल हा घरी नव्हता.  ते मूळचे तामिळनाडूचे आहेत. महिलेने अगोदर मुलीची गळफास देऊन आत्महत्या केली. त्यानंतर तिने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय भोसरी एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother kills her daughter then suicide herself bhosari in pimpari chinchwad
First published on: 21-06-2017 at 13:32 IST