चांदणी चौक येथे उभारण्यात येत असलेल्या पुलाला स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांचे नाव देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. वाहतूक कोंडी आणि सातत्याने अपघात होत असल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी चांदणी चौकात पूल उभारण्यात येत आहे. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सेनापती बापट यांचे नाव पुलाला देण्याची मागणी ट्विटद्वारे केली.  चांदणी चौक येथे उभारण्यात येत असलेला पूल मुळशी तालुका, पुणे शहर आणि परिसराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तसेच हा पूल पुणे-सातारा-बंगळुरू महामार्गावरील एक महत्वाचे ठिकाण असणार आहे.

Nitesh Rane, High Court, Nitesh Rane latest news,
वडिलांच्या प्रचारात व्यग्र असल्याने उत्तर दाखल करण्यास मुदतवाढ द्या, नितेश राणेंची उच्च न्यायालयात मागणी
Mumbai, Mumbai dabbawala, Removal of dabbawalla Statue, Removal of dabbawalla Statue at Haji Ali, Potential Removal of dabbawalla Statue, Mumbai dabbawala, haji ali, haji ali chowk, haji ali chowk dabbawal chowk, mangalprabhat lodha, marathi news, dabbawala news, marathi news,
डबेवाल्यांचा पुतळा अन्यत्र हलविण्याचा घाट, संघटनेचा आरोप; देखभालीसाठी नवी कंपनी
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या मुळशी तालुक्यात थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांनी १९२१मध्ये शेतकरी आणि भूमीपुत्रांच्या संघर्षाची पहिली मोठी नोंद असणारा ‘मुळशी सत्याग्रह’ केला. या सत्याग्रहाला नुकतीच शंभर वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने या सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांच्या स्मरणार्थ चांदणी चौक येथील उड्डाण पुलास त्यांचे नाव देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करता येणे शक्य आहे. त्यामुळे या बाबत सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा, असे सुळे यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.