पुणे : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाकडून तर मलिक यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीने झाल्याचा आरोप करत त्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुरुवारी आंदोलने करण्यात आली.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांना ईडीने बुधवारी अटक केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आंदोलन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊदशी संबंधित मालमत्तांबरोबर आर्थिक व्यवहार मलिक यांनी केल्याचे ईडीकडून जाहीर केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहण्याचा अधिकार मलिक यांना नसून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी  शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली. संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, संदीप लोणकर, दत्ता खाडे, दीपक नागपुरे, अर्चना पाटील यावेळी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या सकाळच्या आंदोलनानंतर केंद्रातील भारतीय जनता पक्षाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून खोटी चौकशी आणि दडपशाहीच्या विरोधात हे आंदोलन असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ईडीद्वारे सूडबुद्धीने कारवाई सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Prime Minister Narendra Modi addressing an election campaign rally in Jalore, Rajasthan. (Photo: BJP Rajasthan/ X)
मोदींविरोधात काँग्रेस आक्रमक; मुस्लिमांना संपत्तीचे फेरवाटप करण्याच्या आरोपावरून संतप्त प्रतिक्रिया, आयोगाकडे तक्रार
NCP Sharad Pawar group has filed its candidacy of Dhairyashil Mohite-Patil in Madha
माढ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते-पाटील यांची उमेदवारी दाखल
Suresh taware, NCP,
मविआत निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने केला उमेदवार जाहीर, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांचा आरोप
RSS
‘आरएसएस’ विरोधात पत्रपरिषद घेणे भोवले, काय आहे प्रकरण जाणून घ्या सविस्तर…