भारतीय जनता पक्षाचे नेते, पालकमंत्री आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित असलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचारगीत असलेले ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हे गाणे वाजविण्यात आले. चंद्रकांत पाटील कार्यक्रमस्थळी येताच गाणे वाजविण्यात आल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी डीजे चालकाला ताब्यात घेतले आहे.

दिवाळीनिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याकडून रास्ता पेठेत फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील येताच ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हे गाणे डीजेवरून वाजविण्यात आले. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताला राष्ट्रवादी काँग्रेसचे गाणे लावल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी डीजे चालकाला ताब्यात घेतले आहे.

dhairyasheel mohite patil marathi news
मोहिते-पाटील यांच्या बंडामुळे माढ्यातील राजकीय समीकरणे बदलली
Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
Rohit Pawars allegations against Eknath Khadse
रोहित पवार यांचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप, म्हणाले, ‘अटकेच्याच भितीने…’
Congress Leader Satish Chaturvedi said Nana Patole Will Become Maharashtra s Chief Minister
नाना पाटोलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी, कोण म्हणाले असे वाचा सविस्तर

रास्ता पेठेतील कार्यक्रमस्थळी विनापरवाना साऊंड सिस्टिम उभारण्यात आली होती, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी डीजे चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

निवडणूक काळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘राष्ट्रवादी पुन्हा’ या प्रचारगीताचा वापर केला जातो. भारतीय जनता पक्षाचा मोठा विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गाणे चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमात स्वागतालाच वाजविण्यात आल्याने उपस्थितांमध्ये त्यासंदर्भात उलट सुलट चर्चा रंगली आहे.