राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना-भाजपावर सडकून टीका केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दहा रुपयात थाळी आणि एक रुपयाच आरोग्य चाचणीचे आश्वासन दिले आहे. त्यावर बोलताना अजित पवार यांनी एक रुपयात आरोग्य चाचणी हे थोतांड असल्याची टीका केली. ते पुण्यात सासवडमधील सभेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बाजूने सुप्त लाट असल्याचा दावा त्यांनी केला. पुरंदरमधील शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतार यांचे नाव न घेता त्यांच्यावर अजित पवारांनी अत्यंत बोचरी टीका केली. शरद पवारांवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारख आहे. हा यावेळी निवडूनच कसा येतो ते बघतो मी? असा इशाराच अजित पवार यांनी दिला.

हा माणूस कामाचा नाही. याचं कुठे कुठे काय आहे ते शोधावं लागेल. हा माणूस पुरंदर तालुक्याचा सर्वांगीण विकास करु शकत नाही असे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या डोक्यावर पाच लाख ३ हजार कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर आहे. १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. सर्वपक्षीय नेते वेगवेगळया मतदारसंघांमध्ये सभा घेत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader ajit pawar critisize shivsena bjp dmp
First published on: 19-10-2019 at 14:31 IST