अनिवासी भारतीय तरूणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना विमाननगर भागात नुकतीच घडली. तिच्या मित्राने तिचे पारपत्र ताब्यात घेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरूणी पुण्यात शिक्षणासाठी आली आहे.

पीडित मुलगी वीस वर्षांची आहे. तिचे आई-वडील मूळचे के रळचे आहेत. नोकरीनिमित्त तिचे पालक दुबईत स्थायिक झाले असून त्यांना तेथील नागरिकत्व मिळाले आहे. विमाननगर भागातील एका महाविद्यालयात इंटेरिअर डिझायनिंगचा अभ्यासक्रम करत आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहात ती सन २०१४ पासून राहायला आहे. तिच्या वर्गमैत्रिणीने मित्रासोबत ओळख करुन दिली होती. त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून त्यांच्यातील संवाद वाढला. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तरूणाने तिला वाढदिवसाच्या पार्टीसाठी कल्याणीनगर भागातील एका हॉटेलमध्ये बोलावले. त्यानंतर त्यांच्या परिचय आणखी वाढला. तरूणाने तिला विवाहाचे आमिष दाखवले. तिच्याकडून वेळोवेळी अडीच लाख रुपये उकळले. तिचे क्रेडीट कार्ड त्याने स्वत:कडे ठेवून वस्तू खरेदी केल्या.

nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Iran Israel Attack Updates in Marathi
जप्त केलेल्या जहाजावरील १७ कर्मचारी भारतीय अधिकाऱ्यांना भेटणार, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलं स्पष्ट
Mahindra XUV 3X0 bookings open
महिंद्राच्या नव्या SUV कारला देशातील बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच मोठी मागणी; बुकींग सुरु, पाहा किती मोजावे लागणार पैसे

तरूणाने तिचे पारपत्र ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने तिला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, तरूणी गर्भवती झाली. त्याने तिला गर्भपात करण्यास सांगितले. तरूणी दुबईला काही महिन्यांपूर्वी गेली होती. तिने आई-वडिलांना याप्रकाराची माहिती दिली. ती पुण्यात आल्यानंतर त्याने पुन्हा धमकावण्यास सुरूवात केली. त्याच्या धमक्यांना घाबरलेल्या तरूणीने एका परिचितामार्फत बंधूभाव भाईचारा समितीचे अध्यक्ष शाबीर शेख आणि सरचिटणीस यासीन शेख यांना ही माहिती दिली.

शेख यांनी तिला धीर दिला. पुणे पोलिसांच्या महिला साहाय्य कक्षात तिला त्यांनी नेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी तरूणीसोबत संवाद साधला. पीडित तरूणीचा जबाब नोंदवण्यात आला आहे. हे प्रकरण येरवडा पोलिसांकडे तपासासाठी सोपवण्यात आले आहे.