चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ एका ४५ वर्षीय इसमाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी साडेआठ वाजता घडली. अद्याप या मृताची ओळख पटू शकलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेने दिलेल्या धडकेने एका ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी साडेआठ वाजता चिंचवड स्थानकाजवळ हा अपघात झाला. इसमाला रेल्वेने धडक दिल्याने तो मृत पावल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलीस पुरुषोत्तम करदाळे यांनी दिली. मात्र अद्याप मृताची ओळख पटली नसून ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One killed in railway accident in chinchwad
First published on: 17-10-2017 at 18:52 IST