सिंहगड रस्त्यावरील धायरी फाट्यानजीक जिजामाता बॅंकेजवळ गुरुवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून एकाची हत्या केली. अर्जुन घुले असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते नांदोशी गावचे माजी सरपंच होते. घुले यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होते.
भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात दहशत पसरली. गोळीबाराच्या घटनेनंतर या ठिकाणी वाहतुकीची कोंडीही झाली. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दत्तवाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jul 2013 रोजी प्रकाशित
पुण्यात सिंहगड रस्त्यावर गोळ्या घालून माजी सरपंचाचा खून
सिंहगड रस्त्यावरील धायरी फाट्यानजीक जिजामाता बॅंकेजवळ गुरुवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून एकाची हत्या केली.

First published on: 04-07-2013 at 02:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One person dead in firing on sinhgad road in pune