बारावी परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी

परीक्षा अर्ज ऑनलाइन  पद्धतीने भरले जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी शाळा-कनिष्ठ महाविद्यालयामार्फत परीक्षा अर्ज भरणे आवश्यक आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या बारावीच्या  परीक्षेसाठी १२ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज नियमित शुल्काद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. त्यात कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना १२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान, तर व्यवसाय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी यांना ३ डिसेंबर ते ११ डिसेंबर दरम्यान अर्ज भरता येईल.

 परीक्षा अर्ज ऑनलाइन  पद्धतीने भरले जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी शाळा-कनिष्ठ महाविद्यालयामार्फत परीक्षा अर्ज भरणे आवश्यक आहे. सरल प्रणालीद्वारे नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरले जातील. कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरून घेतल्यानंतर  त्यांना कॉलेज लॉगिनवर प्रीलिस्ट उपलब्ध करून दिलेली असेल

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Online registration for 12th exam akp

Next Story
राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी काकडे, निकम, पाटील यांची चर्चा
ताज्या बातम्या