पुणे : विरार येथील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून प्रकरणात जयेंद्र उर्फ भाई ठाकूर याच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी दिले. ‘टाडा’ कायद्याअंतर्गत दाखल असलेला देशातील शेवटच्या खटल्याचा निकाल न्यायालयाने दिला. दुबे खून प्रकरणात १७ आरोपींना अटक करण्यात आली होती. या खटल्यात न्यायालयाने सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

जयंत उर्फ भाई विष्णू ठाकूर, दीपक ठाकूर, गजानन पाटील अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या खटल्यात नरेंद्र भालचंद्र भोईर, ज्ञानेश्वर पाटील, उल्हास राणे, पॅट्रीक तुस्कानो, राजा जाधव, माणिक पाटील यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

Property worth 113 crores seized by ED in case of builder Tekchandani
बांधकाम व्यावसायिक टेकचंदानी प्रकरणी ११३ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ईडीची कारवाई
D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे

हेही वाचा – पुणे: चेकवर बनावट सही करून पतीने काढले पत्नीच्या बँक खात्यातून लाखो रुपये

विरार येथील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे यांचा नऊ ऑक्टोबर १९८९ रोजी नालासोपारा रेल्वे स्थानकावर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी टाडा (टेररिस्ट अँड डिस्ट्रप्टीव्ह ॲक्टव्हीज (प्रिव्हेंन्शन) ॲक्ट) नुसार कारवाई केली होती. दुबे खून खटल्यात २००४ मध्ये टाडा कायद्यातील विविध कलमे तसेच बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्या प्रकरणी (आर्मस् ॲक्ट) आरोप निश्चित करण्यात आले होते.

हेही वाचा – भोसरी पोलिसांची वेगळीच डोकेदुखी; पोलीस हद्दीत धुळ खात पडलेल्या १९८६ पासूनच्या मूळ गाडी मालकांचा घेत आहेत शोध

या खटल्यात सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील ॲड. सतीश मिश्रा यांनी बाजू मांडली. बचाव पक्षाकडून ॲड. सुदीप पासबोला, ॲड. सुधीर शहा, ॲड. रोहन नहार, ॲड. प्रीतेश खराडे, ॲड. सचिन पाटील, ॲड. रोहित तुळपुळे यांनी बाजू मांडली.