महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे सोमवारपासून (९ मे) दोन दिवसांच्या स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या महोत्सवात प्रेक्षकांना प्रवेश विनामूल्य मिळणार असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर हे प्रवेश मिळतील.

राज्याचे सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पं. मनोहर चिमोटे यांचे शिष्य पं. शारंगधर साठे आणि पं. शंकररावजी गायकवाड यांचे नातू पं. प्रमोद गायकवाड यांची संवादिनी आणि शहनाई जुगलबंदी, जयपूर घराण्याच्या गायिका डॉ. अश्विनी भिडे -देशपांडे यांच्या शिष्या सानिया पाटणकर आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य व पुत्र श्रीनिवास जोशी यांचे शास्रीय गायन होईल. पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाने पहिल्या दिवसाची सांगता होईल.

Due to summer the price of lemon continues to increase
उन्हामुळे लिंबाची दरवाढ कायम
All the Chief Executive Officers of the Zilla Parishad were given instructions regarding the recruitment of teachers Pune print news
शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया कधीपासून? शिक्षण विभागाने काय सांगितले?
Radio images of the Sun obtained by scientists pune news
शास्त्रज्ञांनी मिळवली सूर्याच्या रेडिओ प्रतिमा
seven injured after machinery in trailer
लष्कर भागात मोटारीची दहा दुचाकींना धडक; दुचाकीस्वार तरुण जखमी

महोत्सवात मंगळवारी (१० मे) विलायत खानी घराण्याचे पं. मारुती पाटील यांचे सतारवादन, शर्वरी जमेनीस यांचे कथक नृत्य होणार असून पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. आनंद भाटे यांच्या गायनाने महोत्सवाचा समारोप होईल.