पिंपरी- चिंचवड शहरातील उच्चभ्रू असलेल्या वाकडमध्ये खासगी रुग्णालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. फुटपाथवर मंडप टाकून हा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाला महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कुठलीही परवानगी नाही. अशी माहिती ‘ड’ प्रभागाचे अधिकारी अंकुश जाधव यांनी लोकसत्ता ऑनलाइनला दिली. नियमांचे उल्लंघन करून फुटपाथवर घेतल्या जात असलेल्या कार्यक्रमाला अजित पवार यांनी उपस्थिती लावून पाठराखण केली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा – पिंपरीत नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंडाला गुंडा विरोधी पथकाचा चोप; ठोकल्या बेड्या

हेही वाचा – गुढीपाडव्यानिमित्त खरेदीचा उत्साह; घरखरेदीची कोट्यवधींची गुढी, वाहनांची आगावू नोंदणी, सराफा बाजारात गर्दी

सविस्तर माहिती अशी की, वाकडमध्ये एका खासगी रुग्णालयाचे उद्घाटन हे अजित पवार यांच्या हस्ते झाले. रुग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी सुरू होत आहे. ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. परंतु, नियमांचे उल्लंघन करून फुटपाथवर आणि रस्त्यावर मंडप टाकून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. अशा प्रकारे फुटपाथवर कार्यक्रम घेण्याची परवानगी देता येत नाही. असे खुद्द महानगरपालिकेच्या दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. याबाबत महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून कार्यक्रमाच्या ठिकाणी कारवाई होण्याची शक्यता आहे.