संतापजनक! फूड डिलिव्हरी बॉयची रस्त्याने जाणाऱ्या तरुणीवर अश्लिल शेरेबाजी; चुंबन घेण्याचा प्रयत्न

तरुणीने वाकड पोलिसात धाव घेऊन अज्ञात डिलिव्हरी बॉयच्या विरोधात तक्रार दिली आहे.

Pimpri Chinchwad Obscene swearing food delivery boy woman walking street

मुंबईच्या साकीनाका भागात महिलेवर अमानुष अत्याचार केल्याच्या घटनेने मुंबईसह संपूर्ण राज्य सुन्न झाले आहे. महिलेवर अमानुषपणे झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर यात तिचा मृत्यू झाला. या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाकड परिसरात ३० वर्षीय तरुणी भावासह घरी जात असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या फूड डिलिव्हरी बॉयने अश्लिल शेरेबाजी करत बळजबरीने मिठी मारुन चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणीने वाकड पोलिसात धाव घेऊन अज्ञात डिलिव्हरी बॉयच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलीस या विकृत आरोपीचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी नेपाळ येथील असून तिचा भाऊ आणि ती चायनीज विकण्याचा गाडा चालवून पोट भरतात. रात्री उशिरा त्यांचा गाडा बंद होतो. सोमवारी मध्यरात्री पाऊने बाराच्या सुमारास भाऊ आणि बहीण दोघे ही घराच्या दिशेने चालत जात होते. रात्री उशीर झाल्याने कुत्रे भुंकत होते म्हणून भाऊ कुत्र्यांना हकलवत पुढे चालत होता. तेवढ्यात, अचानक दुचाकीवरून आलेल्या फूड डिलिव्हरी बॉयने तरुणी एकटी असल्याच पाहून बेसावध तरुणीच्या जवळ येत अश्लील शेरेबाजी केली. दुचाकीवरूनच एका हाताने मिठी मारून गालाचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तसेच अश्लीश चाळे करण्याचा देखील प्रयत्न केला.  दरम्यान तिच्या भावाला पाहताच फूड डिलिव्हरी बॉय तिथून फरार झाला आहे. या घटनेमुळे तरुणीच्या मनात भीती निर्माण झाली असून शहरात महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अद्याप आरोपीला अटक नसून त्याचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pimpri chinchwad obscene swearing food delivery boy woman walking street abn 97 kjp