पिंपरी- चिंचवडमध्ये पिस्तूल विक्री करणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. अनुप नवनाथ सोनवणे असे या तरुणाचे नाव असून त्याने मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा केल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या पिंपरी- चिंचवडमधील निगडी येथे राहणारा अनुप सोनावणे हा डिप्लोमाधारक आहे. अनुप हा मूळचा बीडचा आहे. अनुपचा लेबर सप्लायचा व्यवसाय आहे. मात्र, यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्याचे समाधान होत नव्हते. कमी वेळेत जास्त पैसे मिळवण्यासाठी त्याने पिस्तूल विक्रीचा पर्याय अवलंबला. यासाठी अनुपने महिन्याभरापूर्वी मध्यप्रदेशच्या उमरटी येथून पिस्तुल आणल्या होत्या. अनुपचा पहिला ग्राहक मोशी येथील त्याचा मित्र आणि चांदणी हॉटेलचा मालक अवधूत गाढवे होता. त्याने दोन पिस्तुल आणि ११ जिवंत काडतुसे विकत घेतल्या होत्या. गुन्हे शाखेने त्यांचे बिंग फोडत, त्यांना बेड्या ठोकल्यात. तसेच सात पिस्तुल आणि पंधरा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri crime branch arrest diploma holder in arms racket
First published on: 29-08-2018 at 18:28 IST