पुणे महापालिकेच्या १६२ जागांसाठी उभे असलेल्या १ हजार ९० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. आता गुरूवारी या सर्वांच्या राजकीय वाटचालीचा निकाल लागणार आहे. १६२ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत सकाळच्या सत्रात चांगला प्रतिसाद मिळाला होता. ते पाहता यंदा विक्रमी मतदान होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु दुपारी १२ नंतर मतदारांचा उत्साह कमी झाल्याचे दिसून आले. उन्हाच्या तडाख्यामुळेही मतदारांनी घराबाहेर पडणे टाळले. दुपारी ३.३० पर्यंत ४३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. मात्र मागील वेळेपेक्षाही यंदाचा आकडा जास्त असेल असे सांगण्यात येते. एका महिला मतदाराने बोटावरील शाई जात असल्याची तक्रार केली. असाच प्रकार पिंपरी चिंचवड महापालिका भागातही घडली. काही ठिकाणी तणावाचे प्रसंग दिसून आले. वडगाव बुद्रुक येथे बोगस मतदानाप्रकरणी चार युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

यंदाच्या महापालिका निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे  यात अनेकांना एक लिटर पेट्रोल मोफत मिळाले. परंतु, अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांकडून हे स्क्रॅच कार्ड वाटण्यात येत नसमतदानाचा टक्का वाढावा म्हणून पहिल्या १५० मतदारांना स्क्रॅचकार्ड देण्यात आले.ल्याचीही तक्रार करण्यात आली. या वेळी प्रथमच तृतीयपंथीयांनीही मतदान केले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नगरसेवक सचिन भगतसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सांयकाळी मतदानाची वेळ संपल्यानंतरही अनेक ठिकाणी मतदारांची मोठी रांग लागली होती.

Supreme Court notice to Election Commission to hold fresh poll if NOTA gets more votes
सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस; ‘नोटा’ला जास्त मते मिळाल्यास नव्याने मतदान घेण्याविषयी विचारणा
wardha lok sabha seat, Special Facilities, polling in wardha, Set Up for Voters, Hirakni Rooms, Lactating Mothers, Hirakni Rooms for Lactating Mothers, marathi news,
वर्धा : हिरकणी कक्ष घेत आहेत लक्ष वेधून!
election commission measure to increase voter turnout In second phase of lok sabha polls
मतदानाचा टक्का वाढण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात खबरदारी; निवडणूक आयोगाकडून विशेष कृती गट
Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?

आता भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सत्तेसाठी जोरदार चुरस असून मतदार ‘परिवर्तन’ घडविणार की सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारडय़ात मते टाकणार हेही आता गुरूवारी स्पष्ट होणार आहे. महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेत सत्ता आहे. त्यामुळे पुन्हा सत्ता मिळवून हॅटट्रिक साधण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असून कारभारी बदलाची हाक देत भाजपला परिवर्तनाची अपेक्षा आहे.
शहरातील तीन हजार ४३१ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. गेल्या तीन आठवडय़ांपासून शहरातील राजकीय वातावरण पदयात्रा, प्रचारफेऱ्या, नेत्यांच्या जाहीर सभांमुळे ढवळून निघाले होते. महापालिकेची यंदाची निवडणूक ही चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने झाली.

Updates: 

५.३०: मतदानाची वेळ संपली तरी काही ठिकाणी मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत.

५.१५: मतदानाची वेळ संपण्यास अवघी काही मिनिटे शिल्लक असताना बिबवेवाडी येथील मतदान केंद्रावर मोठी गर्दी होती.

४.५५: शिवाजीनगर भागातील मतदारकेंद्रात मतदारांची गर्दी कमी

४.४०: धनकवडीत समर्थ बालवाडी शाळेसमोर मतदान केंद्राबाहेर पोलिसांनी लाठीचार्ज केला. घटनेची माहिती घेत असताना पत्रकारांवरही लाठी चार्ज.

४.२०: प्रभाग क्रमांक ९ मध्ये इतर पक्षाच्या उमेदवारांनी बाहेरगावाहून बोगस मतदार आणंल्याचा भाजप उमेदवार अमोल बालवड़कर यांचा आरोप. बोगस मतदार आणणाऱ्या ३ चारचाकी वाहनांची हवा सोडली. बोगस मतदारांना आणणाऱ्या उमेदवारावर कारवाई करण्याची केली मागणी.

४.१०: बाणेरमध्ये तणावाचे वातावरण, पोलीस बंदोबस्तात वाढ

४.००: दुपारी ३.३० वाजेपर्यंतची टक्केवारी-  प्रभाग ३० जनता वसाहत,  ३३.१८ टक्के, प्रभाग ३३ वडगाव-धायरी ४०.४१ टक्के, प्रभाग ३४, हिंगणे- सनसिटी ३७.३४ टक्के

३.५०: बाणेरमध्ये बाबुराव चांदेरे यांच्या दोन गाड्या फोडल्या. विनायक निम्हण यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी. सहा जण पोलिसांच्या ताब्यात.

३.४०: दुपारी ३.३० पर्यंत ४३ टक्के मतदान

३.१५: प्रभाग २१ मधील मतदान यंत्रात बिघाड

३.००: सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नगरसेवक सचिन भगतसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

२.५०: प्रभाग क्र. २८ सॅलिसबरी पार्क येथील ऋतुराज सभागृह येथील बूथवर दुपारी अडीच वाजता मतदान यंत्रात बिघाड झाल्याने १५ मिनिटे बंद पडले होते.

२.३०: गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांची चोख बंदोबस्त

२.२०: मतदारांना आणण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू

२.१०: मतदानाला अवघे काही तास शिल्लक

२.००: प्रभाग क्रमांक एकमधील बाबुराव टिंगरे शाळेत एका महिलेच्या नावाने बोगस मतदान.

१.५०: पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी दुपारी १.३० पर्यंत ३९.६८ टक्के मतदान

१.४०: दुपारी १.३० पर्यंत ३०. ३८ टक्के मतदान

१.३०: उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे मतदारांची संख्या रोडावली.

१.२०: तृतीयपंथीयांनीही बजावला मतदानाचा हक्क

१.१०: खासदार सुप्रिया सुळे यांनी कात्रज आणि बिबवेवाडी येथे मतदारांशी संपर्क साधला.

Supriya Sule

१.००: मतदानाची शाई दाखवल्यानंतर महिलांच्या हातावर मोफत मेंदी लावण्याचा उपक्रम

१२.५०:  अनेक मतदान केंद्र मतदारांअभावी ओस

१२.४०: महिलांनी उत्स्फुर्तपणे मतदान केले.

pune-women-1

१२.३०: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बजावला मतदानाचा हक्क

१२.२५: अनेक मतदानकेंद्रावर अधिकाऱ्यांना मतदारांची वाट पाहावी लागत आहे.

१२.२०:  केळकर संग्रहालयाजवळ मेंदी काढण्यासाठी महिला मतदारांची गर्दी

१२.१५: आमदार मेधा कुलकर्णी यांनी कोथरूड येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

Mla Medha Kulkarni

१२.१०: पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवकांमध्ये उत्साह दिसून आला.

Pune youth voters

१२.०५: माजी महापौर चंचला कोद्रे आणि माजी उपमहापौर बंडू गायकवाड यांनी केले मतदान

१२.००: सकाळी ११.३० पर्यंत १९.५ टक्के मतदान

११.५१: पुण्यात एका उमेदवाराने मतदान कक्षाची पूजा केली.

११.४३: वसंतराव वैद्य शाळेत मतदान करताना फोटो घेण्यावरून एकाची पोलिसांबरोबर हुज्जत

११.३२: मंगळवार पेठ सावित्रीबाई फुले महिला भवन प्रभाग क्रमांक १६ मध्ये मतदारयादीत नावे नसल्याने नागरिकांची मतदान केंद्राबाहेर गर्दी.

११.२५: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या वाहनाची तोडफोड केल्याची घटना

११.२०: वडगाव बुद्रूक येथे बोगस मतदान करणारे चार युवक पोलिसांच्या ताब्यात

११.१०: पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवकांची संख्या मोठी

११.०५: पुण्यातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये मतदारांच्या हाताला लावलेली शाई पुसली जात असल्याची तक्रार

११.००: केंद्र क्रमांक १६ मध्ये आतापर्यंत ८ % मतदान. मतदान करायला दीड मिनिटे लागत आहेत.

१०.४५: तरूण व वृद्ध मतदात्यांमध्ये उत्साह

१०.३८: सुरूवातीच्या दोन तासांत १२ टक्के मतदान झाल्याची माहिती आयुक्त कुणालकुमार यांनी दिली.

१०.३०: कोथरूड परिसरातील सुतारदरा येथील अथर्व शाळेत व पौड रस्त्यावरील उत्सव हॉल येथे दोन बोगस मतदार पोलिसांच्या ताब्यात

१०.२०: सकाळी साडेनऊपर्यंत १२ टक्के मतदान

१०.१२: पालकमंत्री गिरीश बापट यांनी मतदानाचा हक्क बजावला.

bapat45

१०.०५: पालकमंत्री गिरीश बापट मतदान केंद्रावर

Girish Bapat

९.५०:  ज्येष्ठ नागरिकांची मतदानासाठी गर्दी

९.४५: क्रिकेटपटू केदार जाधव याने कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.

९.४०: गायक, संगीतकार सलील कुलकर्णी यांनीही मतदान केले.

salil kulkarni

९. ३२: जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकामध्ये भाजपला यश मिळणार आहे. मागील २५ वर्षांत पुण्यात ज्या चुका झाल्या आहेत. त्या सुधारल्या जाणार आहेत. जनता विकासाला मतदान करत आहे. राज्यात मध्यवर्ती निवडणूक होणार नसून पाच वर्षे राज्य सरकार चांगल्या प्रकारे काम करणार, असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मतदानानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

९.२५: केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कोथरूड येथील जोग स्कूलमध्ये केले मतदान

union Prakash javdekar

९. १५: मतदान केंद्रावर प्रत्येक उमेदवारांची वैयक्तिक माहिती देणारे फलक

९.०५: पुण्यातील एका मतदान केंद्रावर दिव्यांग मतदात्याला केंद्रात नेताना नातेवाईक व कर्मचारी.

Pune Handicap Voter

 

९.००: शनिवार पेठेतील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत.

pune-voting-1

८.५५: मतदान करताना महापौर प्रशांत जगताप

Prashant jagtap

८. ५०: महापौर प्रशांत जगताप आणि रत्नप्रभा जगताप यांनी मतदान केले.

८.४०: पर्वती, सदाशिव पेठ येथील मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रात बिघाड

८.३०: मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पहिल्या १५० मतदारांना स्क्रॅच कार्डची सुविधा. परंतु, अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून मतदारांना वितरण केले जात नसल्याची तक्रार

८.२३: गतवेळी पुणे शहरात ५०.९२ टक्के मतदानाची नोंद

८.१५: शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळा केंद्र  क्रमांक एकमधील मतदान यंत्र खराब, ७.३० पासून नागरिक रांगेत उभे

८.१०: अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी

८.०५: सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत होणार मतदान

७.५५:  पुणे शहरात २६ लाख ३४ हजार ८०० मतदार आपला हक्क बजावणार

७.५०: मतदारांना मतदार यादीतील क्रमांक, मतदान केंद्राची संपूर्ण माहिती votersearch.punecorporation.org, pmcvotersearch.org, puneconnect या मोबाइल अॅपवर व १८००१०३०२२२ टोल फ्री क्रमांकावर मिळेल.

७. ४५: केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर कोथरूड येथील मयूर कॉलनीतील पी. जोग शाळेत सकाळी नऊ वाजता मतदान करणार आहेत.

७.४०: पालकमंत्री गिरीश बापट हे सकाळी १० वाजता शनिवार पेठेतील अहिल्यादेवी हायस्कूल येथे मतदान करणार आहेत.

७. ३५: शिवसेना उपनेत्या तथा प्रवक्त्या आमदार डॉ.नीलम गोऱ्हे आणि त्यांच्या आई लतिका गोऱ्हे यांच्यासह सकाळी १० वाजता मॉडेल कॉलनीतील विद्याभवन शाळेत मतदान करणार आहेत.

७.३०: मतदानास सुरूवात

७. १८: गुन्हे शाखेची पथके आणि राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा तैनात

७. १५ : पुणे शहरात ३ हजार ४३१ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था

७. १०: १६२ जागांसाठी एक हजार ९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

७.०२: पुण्यातील नवी पेठेत प्रभाग क्र.२९ मध्ये पहाटे ५ च्या सुमारास तीन कार्यकर्ते पत्रके वाटताना ताब्यात. भाजपचे उमेदवार धीरज घाटे यांचे कार्यकर्ते असल्याची माहिती. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

७.००: एक हजार ९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात