पुणे : आळंदीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात १०८ क्रमांकावरील सुविधेच्या रुग्णवाहिकेत चक्क घोणस या विषारी सापाने मुक्काम ठोकला असल्याची बाब समोर आली. त्यामुळे नागरिक आणि रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रुग्णवाहिकेची स्वच्छता करताना हा प्रकार उघडकीस आला. सर्पमित्राला बोलवून हा साप पडकण्यात आला असून, त्याला सुरक्षितपणे वनक्षेत्रामध्ये सोडून देण्यात आले आहे.

हेही वाचा >>> मुंबई : मढ समुद्रकिनारी सापडलेल्या कासवाचे ‘फ्लिपर टॅगिंग’ करणार

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
Maldhok birds
अग्रलेख: पूतनामावशीचे पर्यावरणप्रेम!

आळंदीच्या ग्रामीण रुग्णालयासाठी १०८ क्रमांकावर सेवा देणारी रुग्णवाहिका कार्यरत आहे. तातडीची सेवा देण्यासाठी तिचा वापर केला जातो. ही रुग्णवाहिका रुग्णालयाच्या आवारातच लावण्यात आली होती. चालकाकडून रुग्णवाहिकेची स्वच्छता करण्याचे काम सुरू असताना अचानक त्याला एका कोपऱ्यात काहीतरी वेगळे दिसले. लक्षपूर्वक पाहिले असता तो साप असल्याचे कळाल्याने तोही घाबरून गेला. रुग्णवाहिकेच्या खिडक्या उघड्या असल्याने त्यातून हा साप आतमध्ये आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तातडीने एका सर्पमित्रास रुग्णालयात बोलविण्यात आले. हा साप अत्यंत विषारी प्रकारातील घोणस असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा >>> तस्करांमुळे गेंडय़ांचे अस्तित्व धोक्यात; जगात केवळ २३,४३२ आफ्रिकन गेंडे शिल्लक

सर्पमित्राने त्याला काळजीपूर्वक पकडून एका बरणीत ठेवले. त्यानंतर सापाला वनक्षेत्रात सोडण्यात आल्याची माहिती आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक ऊर्मिला शिंदे यांनी दिली. त्या प्रकारात कोणालाही इजा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकारानंतर रुग्णालयाच्या परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेनंतर तातडीने परिसराच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले. आळंदी नगर परिषदेच्या वतीने रुग्णालय प्रशासनाला योग्य त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आरोग्य सेवेतील वाहनांशिवाय रुग्णालयाच्या आवारात इतर वाहने न लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.