पुणे : जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात झालेल्या अतिवृष्टीचा, संततधार पावसाचा फटका राज्यातील डाळिंब उत्पादकांना बसला आहे. आंबिया बहरातील सुमारे ४० टक्क्यांवरील डाळिंबाचे पीक फळकुज आणि तेलकट रोगामुळे मातीमोल झाले आहे. संततधार पावसाचा फटका सांगली, सोलापूर, पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. मुळातच खोडकिडी, तेल्या रोगाने राज्यातील सुमारे ७० टक्के डाळिंबाच्या बागा काढून टाकल्या आहेत. आता उरलेल्या सुमारे ५० हजार हेक्टरवरील बागाही अडचणीत आल्या आहेत. मागील दहा-बारा दिवसांपासून बहुतेक ठिकाणी अतिवृष्टी आणि संततधार पाऊस सुरू होता. अतिवृष्टीचा फारसा फटका डाळिंबाला बसत नाही. मात्र, संततधार पाऊस डाळिंबाला धोकादायक असतो. वातावरणात आद्र्रता वाढून बुरशीजन्य रोगासह तेल्या आणि फळकुज मोठय़ा प्रमाणात झाली आहे. आंबिया बहरात घेतलेल्या एकूण बागांपैकी ४० टक्क्यांवरील बागांना या पावसाचा फटका बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सवाच्या काळात डाळिंब बाजारात यावीत. चांगला दर मिळावा म्हणून शेतकरी आंबिया बहर घेतात. या बहरात उत्पादित झालेले डाळिंब शक्यतो स्थानिक, देशांअर्तगत बाजारातच विकली जातात. काही प्रमाणात बांगलादेशसह आखाती देशांना निर्यात होते. युरोपीय देशांना आंबिया बहरातील डाळिंबे निर्यात होत नाहीत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pomegranate losses approx rs 500 crore due to heavy rains zws
First published on: 20-07-2022 at 05:45 IST