scorecardresearch

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेवर पुणे पोलिसांकडून कारवाईची शक्यता

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पुणे पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता आहे.

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पुणे पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अ‍ॅड. सदावर्ते यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. अ‍ॅड. सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. सातारा पोलिसांनी एका प्रकरणात अ‍ॅड. सदावर्ते यांना अटक केली. सातारा न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एक सप्टेंबर २०२० रोजी त्यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत अमर रामचंद्र पवार (रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणात अ‍ॅड. सदावर्तेना अटक होण्याची शक्यता आहे. याबाबतचा अहवाल पुणे पोलिसांनी गृहविभागाकडे पाठविला आहे. अ‍ॅड. सदावर्ते यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शासनाकडून आदेश मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Possibility action pune police gunaratna sadavarte st employees lawyer ysh

ताज्या बातम्या