पुणे : तपास यंत्रणांच्या गैरकारभाराची माहिती एकत्रित करून संसदेतील काही ज्येष्ठ सहकाऱ्यांबरोबर देशाचे गृहमंत्री आणि शक्य झाल्यास पंतप्रधानांना भेटणार आहोत. आमच्या सहकाऱ्यावर जी वेळ आली, ती वेळ आणि यातना अन्य कोणाला सहन कराव्या लागू नयेत, यासाठीही ही भेट असेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनाच्या पार्श्वभूमीवर दिली. माजी मंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली होती. तेरा महिन्यांनंतर त्यांना जामीन मिळाला. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले की, सत्तेचा दुरुपयोग कसा होतो याचे अनिल देशमुख हे उत्तम उदाहरण आहे. न्यायालयाने दिलेला निकाल हा अनिल देशमुखांवर अन्याय करणाऱ्यांना सुबुद्धी देण्यासाठी आणि त्यांच्या धोरणात बदल करण्यासाठी उपयुक्त ठरेल, ही अपेक्षा आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाही, असे न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. देशमुख यांच्यावर आधी शंभर कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला. दोषारोप पत्र ठेवताना ही रक्कम साडेचार कोटी रुपये दाखविण्यात आली आणि अंतिम दोषारोपपत्रात एक कोटी दर्शविण्यात आली. त्यामुळे तपासी यंत्रणांच्या गैरकारभाराची माहिती एकत्रित करून संसदेतील काही ज्येष्ठ सहकाऱ्यांबरोबर गृहमंत्री आणि शक्य झाल्यास पंतप्रधानांना भेटणार आहोत. आमच्या सहकाऱ्यांवर जी वेळ आली ती वेळ अन्य कोणावरही येऊ नये, यासाठी ही भेट असेल.

no permission for fodder camps to curb corruption
यंदा चारा छावण्यांना परवानगी नाही; भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय? 
If you want to talk negatively leave gathering says Minister Chandrakant Patil
नकारात्मक बोलायचे असेल तर मेळाव्यातून बाहेर जा; मंत्री चंद्रकांत पाटील यांची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर