पिंपरीतल्या प्रसिद्ध ओरिगॅनो स्पा अँड सलूनवर छापा टाकत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यात दोन नागालँड येथील तर एक महाराष्ट्रीय तरुणीची सुटका करण्यात सामाजिक सुरक्षा पथकाला यश आले आहे. या प्रकरणी स्पा मालकासह महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेंद्रकुमार झा आणि स्नेहाकुमारी झा अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावं असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतल्या ओरिगॅनो स्पा अँड सलून येथे स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय होत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार, सामाजिक सुरक्षा पथकाने डमी ग्राहक पाठवून त्या ठिकाणी खरंच वेश्याव्यवसाय केला जातो का? याची खात्री केली. दरम्यान, डमी ग्राहक आत असताना त्याठिकाणी वेश्याव्यवसाय होतो, अस कळवताच छापा टाकण्यात आला.

या कारवाईमध्ये ३ हजार ८०० रोख रक्कम, ६ हजार किंमतीचा मोबाईल, २५ रुपयांचं निरोधचं पाकीट असा एकूण ९ हजार ८२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ अशोक डोंगरे,सिसोदिया, सोळंके यांच्या पथकाने केली आहे. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prostitution in hotel in pimpri pune police caught the criminals vsk 98 kjp
First published on: 02-12-2021 at 15:32 IST