विजेवर धावणारी वाहने ( ई- वाहने) खरेदी करण्याच्या धोरणाअंतर्गत महापालिकेने मोठा गाजावाजा करून अधिका-यांसाठी भाडेतत्वावर घेतलेल्या मोटारींचा चार्जिंगसाठी ३५ किलोमीटरचा प्रवास होत आहे. व्यवस्था नसल्याने मोटारी चार्जिंगसाठी भोसरीत न्याव्या लागत असल्यामुळे या मोटारींचा वापरही अल्प होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महापालिकेने अधिकारी वर्गासाठी वीजेवर धावणाऱ्या ३६ मोटारी भाडेतत्वावर घेण्यास मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात यातील आठ मोटारी महापालिकेच्या वाहन ताफ्यात दाखल झाल्या आहेत. सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी या मोटारींचा वापर सुरू केला असला तरी चार्जिंग व्यवस्थे अभावी अनेकदा त्यांचा वापर करणे अडचणीचे ठरत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune 35 km journey for e vehicle charging pune print news msr
First published on: 29-03-2022 at 11:59 IST