पुणे : हातात पिस्तूल घेऊन मृत गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करणार्‍याला अटक

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आरोपीला नवनाथ दत्त मंदिराजवळून ताब्यात घेण्यात आले.

पुण्यातील बिबवेवाडी परिसरात दोन महिन्यांपुर्वी एका गुंडाची हत्या झाली होती. तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला करोना निर्बंध मोडत जवळपास १५० हून अधिक जण सहभागी झाले होते. आता त्याच भागातील एका मृत गुन्हेगाराचा वाढदिवस त्याच्या सहकाऱ्यांनी केक कापून आणि हातात पिस्तूल घेऊन साजरा केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संबधित आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

अक्षय ऊर्फ प्रसाद कानिटकर रा. बिबवेवाडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, भावेश कांबळे या गुन्हेगाराचा मागील वर्षी खून झाला होता. त्याचा साथीदार अक्षय ऊर्फ प्रसाद कानिटकर हा भावेशचा वाढदिवस साजरा करण्यासाठी १० ते १५ जणांसोबत केक घेऊन आला असून, त्याच्या हातामध्ये पिस्तूल आहे व ते सर्वजण नाचत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार संबधित आरोपीला नवनाथ दत्त मंदिराजवळून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्या जवळ असलेली पिस्तूल ताब्यात घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pune a man was arrested for celebrating the birthday of a dead criminal with a pistol in his hand msr 87 svk

ताज्या बातम्या