पुणे : पुणे लोकसभेच्या निवडणुकीच मतदान दोन दिवसांपूर्वी झाले. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे तिघेजण निवडणुकीच्या रिंगणात होते. या तिघांनी जवळपास ५० दिवसाहून अधिक काळ शहराच्या अनेक भागात जाऊन प्रचार सभा, रॅली, पदयात्रा काढत मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.त्या प्रत्येक उमेदवारांला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहण्यास मिळाले.

निवडणुकीचे मतदान होऊन दोन दिवस झाले असून याचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. पण त्याच दरम्यान पुण्यातील शरद पवार गटाचे अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे यांनी दरवर्षीप्रमाणे निवडणुकीपूर्वी आणि नंतर उमेदवारांच्या वाडेश्वर कट्टयाचे आयोजन केले होते. यावेळी रविंद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांनी उपस्थित राहून इडली चटणी, शिरा खात दोघांनी निवडणुकीमधील आलेले अनुभव खेळीमेळीच्या वातावरणात सांगितले. मात्र यावेळी मुरलीधर मोहोळ हे काही वैयक्तिक कारणास्तव येऊ शकले नाही.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
in pune 27 former corporators are in touch with the Congress BJP struggle to stop them
माजी नगरसेवकांमुळे पुण्यात भाजपची धावाधाव
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Sharad pawar on Ajit Pawar baramati
बारामतीच्या मतदानानंतर अजित पवार प्रचाराला अनुपस्थित; शरद पवार काळजी व्यक्त करत म्हणाले, “ते…”
Praful Patel on Uddhav Thackeray
प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “उद्धव ठाकरे भाजपाबरोबर…”
Prithviraj Chavan prakash ambedkar
“प्रकाश आंबेडकरांचा खरा चेहरा समोर आल्यामुळे…”, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य; आघाडी फिस्कटण्याबाबत म्हणाले…
dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक

आणखी वाचा-मी काही पवारसाहेबाच्या किंवा विखे पाटलांच्या घरी जन्माला आलो नाही : रविंद्र धंगेकर

यावेळी वसंत मोरे म्हणाले की, मी शहरातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन प्रचार केला. प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मी स्थानिक आणि विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढवली. या निवडणुकीमधील अनेक आठवणी आहेत. पण यंदाची मतदानाची टक्केवारी लक्षात घेतल्यावर मला ४ लाखांच्या आसपास मत मिळतील आणि जो कोणी उमदेवार निवडून येईल. तो किमान २० ते २५ हजार मतांनी निवडून येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

भविष्यात प्रत्येकाचा हिशोब होणार

रविंद्र धंगेकर आणि तुम्ही शिवसेना, मनसेमध्ये एकत्रित काम केले आहे. यानंतर दोघे ही वेगळ्या पक्षात करीत आहात, त्या पक्षातील अनुभवांबाबत वसंत मोरे म्हणाले की, मी वंचित बहुजन आघाडीमध्ये येऊन महिना झाला असताना मला कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी खूप प्रेम दिले. मी ज्या पूर्वाश्रमीच्या (मनसे) पक्षात २० वर्ष राहीलो. त्या काळात (राज ठाकरे ) साहेबांनी खूप प्रेम दिले. पण पक्षातील (मनसे) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कधीच प्रेम दिले नाही. त्यांनी कायम पाय खेचण्याच काम केलं असल्याची खंत व्यक्त करीत पुढे म्हणाले की, भविष्यात प्रत्येकाचा हिशोब होणार असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी पुण्यातील स्थानिक मनसेच्या नेत्यांना दिला.

आणखी वाचा-अपघाती मृत्यू प्रकरणात तरुणाच्या कुटुंबीयांना एक कोटी ४० लाखांची नुकसान भरपाई

यानंतर रविंद्र धंगेकर म्हणाले की, काँग्रेसकडून कसबा पोटनिवडणुक लढविण्याची संधी मिळाली. त्या संधीच सोनं केलं आणि त्या निवडणुकीला वर्ष होत नाही. तोवर आता लोकसभा निवडणुक लढविण्याची संधी दिली. त्यामुळे याही निवडणुकीत देखील मी विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.