जन्मतारखेचे खोटे प्रमाणपत्र दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील नगरसेविका प्रिया गदादे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश न्यायालयाने गुरुवारी दिला. प्रिया गदादे या प्रभाग क्रमांक ५६ मधून मनसेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. 
गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये निवडणूक लढविताना त्यांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी होते. त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी सादर केलेले जन्मतारखेचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे न्यायालयाने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश दिला. प्रिया गदादे यांचे नगरसेवक पद रद्द झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे महापालिकेतील संख्याबळ २८ इतके झाले आहे.