scorecardresearch

पुणे : करोनातून झाला बरा, पण पत्नीनेच गळा दाबून घेतला जीव; पोलिसांमुळे समोर आलं कारण

अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरणार्‍या पतीला प्रियकराच्या मदतीने संपवलं… करोनामुळे मृत्यू झाल्याचा रचला कट

crime news extra marital affair
विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरुन पतीने पत्नीला तीन महिन्याहून अधिक काळ साखळ्यांनी बांधून ठेवलं होतं. (प्रातिनिधिक छायाचित्र)

करोनाच्या रुपाने काळ आला होता. पण, करोनावर मात करून त्याने मृत्यूला हुलकावणी दिली. करोनातून बरा झाला, पण पत्नीनेच त्याचे प्राण घेतले. अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरणार्‍या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा दाबून हत्या केली. पुणे जिल्ह्यातील उरुळी देवाची येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मनोहर हांडे असं मयत व्यक्तीचं नाव असून, अश्विनी मनोहर हांडे (पत्नी) आणि गौरव मंगेश सुतार (पत्नीचा प्रियकर) अशी आरोपींची नावं आहेत. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी देवाची येथे मयत मनोहर नामदेव हांडे हा पत्नी अश्विनी याचं कुटुंब होतं. मनोहर याला मागील महिन्यात करोना आजार झाला. तो घरीच करोनावर उपचार घेत होता. त्यातून तो बरा देखील झाला होता. मात्र त्याच दरम्यान २४ मे रोजी त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तो करोना आजाराने मृत्यू झाल्याचे त्याच्या पत्नीने कुटुंबियांना सांगितलं. मात्र, हे असत्य फार काळ लपून राहिलं नाही. पोलिसांना त्यांच्या खबऱ्याने मनोहरची हत्या करण्यात आल्याची माहिती दिली. मयत मनोहर याची पत्नी अश्विनी हिचे गौरव या तरुणासोबत अनैतिक संबध होते. त्यातूनच मनोहर याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी गौरव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर, मनोहर याची पत्नी आणि अश्विनी या दोघांनी खून केल्याची कबुली त्याने दिली.

पुणे : प्रियकरासोबतचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर सामूहिक बलात्कार

गौरवने सांगितलं कशी केली हत्या?

अश्विनी आणि गौरव यांचे दोघांचे मागील दोन वर्षापासून अनैतिक संबंध होते. दरम्यान, मनोहर याला करोना झाला. त्याच्यावर घरीच उपचार सुरू होते आणि त्यामुळे त्या दोघांना भेटता येत नव्हते. भेटता येत नसल्याने दोघांनी मनोहरला मारून टाकायचे असं ठरवलं. त्यानुसार अश्विनी हिने २३ मे रोजी रात्री मनोहरच्या दुधात झोपेच्या गोळ्या दिल्या. झोपेच्या गोळ्या दिल्याने त्याला लगेच झोप लागली. त्याच रात्री अश्विनी आणि गौरव या दोघांनी गळा आणि तोंड दाबून खून केला. त्यानंतर आरोपी गौरव हा घटनास्थळावरून निघून गेला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी मयत मनोहर हा उठत नसल्याचे, अश्विनीने दुसर्‍या मजल्यावर राहणार्‍या आईवडिलांना सांगितलं. काही वेळाने सांगितले की, मनोहर याचा करोनामुळे मृत्यू झाला, असं सांगत तिने झालेली घटना लपवली. मात्र तिने बनाव केल्याचे नंतर समोर आले. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी गौरव मंगेश सुतार आणि अश्विनी मनोहर हांडे या दोघांना अटक केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-06-2021 at 15:50 IST
ताज्या बातम्या