महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला त्याच्या नातीच्या जन्माने इतका आनंद झाला की, त्याने नातीला आणि सूनबाईला घरी आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरच बुक केले.

घरात मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त करत या शेतकऱ्याने मंगळवारी नवजात बाळाला आणि बाळाच्या आईला म्हणजेच त्यांच्या सूनेला हेलिकॉप्टरने घरी आणून त्याचे भव्य स्वागत केले. या शेतकऱ्याने नातवासह सुनेचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले.

पुण्यातील बालेवाडी परिसरात राहणारे अजित पांडुरंग बालवडकर यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांना त्यांची नात कृषिका हिचे भव्य स्वागत करायचे होते. त्यामुळे जेव्हा नातीला तिच्या आईचे माहेर शेवळेवाडी येथून आपल्या घरी आणण्याची वेळ आली, तेव्हा त्यासाठी आम्ही हेलिकॉप्टर बुक केले. पुणे जिल्ह्यातील शेवाळवाडी येथे मुलीच्या आजीचे घर आहे.

नातीचे आणि घरच्या लक्ष्मीचे अशाप्रकारे करण्यात आलेल्या भव्य स्वागताची सर्वत्र चर्चा सुरू आहे. म्हणतात ना..शेतकऱ्यांशी नाद करायचा नाय…