scorecardresearch

पुणे : विद्यापीठातील ब्रिटिशकालीन हत्ती तलावाचे पुनरुज्जीवन; पाणी साठवण क्षमतेमध्ये साठ लाख लीटरपर्यंत वाढ

पुनरुज्जीवनानंतर तलावात कासव, विविध पक्ष्यांचा वावर वाढल्याचे डॉ. ठाकूर यांनी नमूद केले. 

hatti talav Pune
तलावाच्या पाण्याचा वृक्षलागवडीसाठी वापर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ब्रिटिशकालीन हत्ती तलावाचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. पुनरुज्जीवनापूर्वी दोन लाख लीटर साठवण क्षमता असलेल्या या तलावातील पाण्याची पुनरुज्जीवनानंतर साठवण क्षमता साठ लाख लीटरपर्यंत वाढली असून, हत्ती तलाव भरल्यानंतर सांडव्यातून बाहेर पडणारे पाणी साठवण्यासाठी नव्या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. 

कर्वे समाज संस्थेच्या बी. डी. कर्वे रीसर्च आणि सामाजिक उत्तरदायित्त्व विभागाचे प्रमुख डॉ. महेश ठाकूर यांनी ही माहिती दिली. कर्वे समाज संस्थेच्या पुढाकारातून आणि कमिन्स इंडियाच्या सामाजिक उत्तरदायित्त्वाअंतर्गत उपलब्ध हत्ती तलावाच्या पुनरुज्जीवनाचे काम करण्यात आले. गेली दोन वर्षे  पुनरुज्जीवनाचे काम सुरू होते. या कामाची कोनशिला बसवण्याचा कार्यक्रम शुक्रवारी (२२ एप्रिल) विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, कमिन्स इंडियाच्या कॉर्पोरेट अधिकारी सौजन्या व्ही. गुरू, कर्वे समाज संस्थेचे अध्यक्ष मधुकर पाठक आदी उपस्थित राहणार आहेत. 

ऐतिहासिक हत्ती तलावात गाळ आणि बांधकामाचे शिल्लक साहित्य टाकल्याने तो पाणी  साठवणासाठी निरुपयोगी ठरला होता. त्यामुळे या तलावाच्या पुरुज्जीवनाच्या कामाचा प्रस्ताव विद्यापीठाला देण्यात आला. या प्रस्तावाला कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि कमिन्स इंडियाने मान्यता दिली. या कामाअंतर्गत तलावाच्या भितींचे बळकटीकरण, पर्जन्य पुनर्जलभरणाची व्यवस्था करण्यात आली. या कामाचा सकारात्मक परिणाम होऊन विद्यापीठ परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांची भूजल पातळी वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच तलावाची पाणी साठवण क्षमताही साठ लाख लीटरपर्यंत वाढली आहे, असे डॉ. ठाकूर यांनी सांगितले.

तलावाच्या पाण्याचा वृक्षलागवडीसाठी वापर

तलावाच्या परिसरात २७ प्रजातीची वृक्षलागवड करण्यात आली आहे.  या नक्षत्र वनातील झाडांच्या जोपासणूक करण्यासाठी तलावातील पाणी सूक्ष्म सिंचन पद्धत वापरण्यात येत आहे. पुनरुज्जीवनानंतर तलावात कासव, विविध पक्ष्यांचा वावर वाढल्याचे डॉ. ठाकूर यांनी नमूद केले. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune hatti talav from savitribai phule university campus revival pune print news scsg

ताज्या बातम्या