पुण्यात पती-पत्नीसह १२ वर्षांच्या मुलीची हत्या करून उकिरड्यात पुरले

ही घटना कधी घडली हेही समजू शकलेले नाही.

कुरकुंडा गावातील राळेवस्ती येथे रोहिदास गोगावले (वय ४५) पत्नी नंदा (वय ४०) व मुलगी अंकिता (वय १२) यांच्यासह राहत होते.

कुरकुंडी (ता. खेड, जि. पुणे) येथे एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करून त्यांना जमिनीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. हे तिन्ही मृतदेह उकिरड्यात पुरण्यात आले होते. गोगावले कुटुंबातील पती-पत्नी व त्यांच्या १२ वर्षांच्या मुलीची अज्ञातांनी निर्घूण हत्या करून त्यांना पुरले होते. ही घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आली.
कुरकुंडी गावातील राळेवस्ती येथे रोहिदास गोगावले (वय ४५) पत्नी नंदा (वय ४०) व मुलगी अंकिता (वय १२) यांच्यासह राहत होते. या तिघांचे मृतदेह आज सकाळी ११ च्या गावातील चारीच्या उकिरड्यात पुरल्याचे आढळून आले. त्यांची हत्या कधी करण्यात आली, हत्ये मागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही घटना कधी घडली हेही समजू शकलेले नाही. त्या दृष्टीने चाकण पोलीस तपास करत आहेत. गोगावले कुटुंबीयांच्या हत्येमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस तपास करत असून अद्याप त्यांना कोणतेही धागेदोरे मिळू शकलेले नाहीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pune khed kurkundi family murder crime

ताज्या बातम्या