करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाउन करण्यात आल्यानंतर पुण्यात विविध आस्थापनांबरोबर शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले. पण त्यानंतर मिशन बिगिन अगेन अंतर्गत टाळेबंदी शिथिल करत पुण्यात विविध गोष्टी सुरु झाल्या. आता पुण्यात उद्यापासून कोचिंग क्लासेस आणि प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

काय आहेत नियम व अटी
पुणे महानगरपालिका प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व शैक्षणिक संस्था कौशल्य विकास, टायपिंग व संगणक प्रशिक्षण संस्था सॅनिटायझेशन तसेच सोशल डिस्टन्सिंग बाबतच्या मार्गदर्शक सूचना नियमांचे पालन करुन उद्यापासून सुरु करण्यास परवानगी.
– पुणे महानगरपालिका प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील इयत्ता ९ वी पासून पुढील कोचिंग क्लासेस सॅनिटायझेशन तसेच सोशल डिस्टन्सिंग बाबतच्या मार्गदर्शक सूचना नियमांचे पालन करुन उद्यापासून सुरु करण्यास परवानगी.
– विद्यार्थ्यांना प्रवेश देताना थर्मल गनद्वारे नियमित तपासणी करावी लागेल.
– मास्क वापर बंधनकारक राहिलं.
– सर्व संस्थांमधील प्रशिक्षक व व्यवस्थापन कर्मचारी यांची कोविड-१९ साठीची RTPCR चाचणी करावी लागेल.
– प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशन मशीन उपलब्ध करुन देणे बंधनकारक राहिलं.
– दोन विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग अंतर राखणे बंधनकारक राहीलं.