पुणे : व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए), संगणक उपयोजन पदव्युत्तर पदवी (एमसीए) या एकात्मिक अभ्यासक्रमांचे प्रवेशही समाईक प्रवेश परीक्षेद्वारे (सीईटी) होणार आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सीईटी देणे बंधनकारक असणार असून, अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत १८ एप्रिल आहे.

राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठी बीबीए, बीसीए, बीएमएम, बीबीएम या अभ्यासक्रमाचे प्रवेश सीईटीद्वारे घेतले जाणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) हे अभ्यासक्रम आपल्या अखत्यारित घेतल्याने या अभ्यासक्रमांचा व्यावसायिक दर्जा मिळाला आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांची आतापर्यंत महाविद्यालय स्तरावर होणारी प्रवेश प्रक्रिया सीईटीच्या माध्यमातून राज्य स्तरावर केंद्रीय पद्धतीने होणार आहे. त्याशिवाय २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी एमबीए एकात्मिक आणि एमसीए एकात्मिक अभ्यासक्रमांनाही ‘महा-बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी’ या परीक्षेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

हेही वाचा : पुणे: वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेशाच्या आमिषाने ६९ लाखांची फसवणूक

एमबीए एकात्मिक आणि एमसीए एकात्मिक अभ्यासक्रमासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी सीईटीबाबतची माहिती घेऊन त्यासाठीची ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया करावी. बीबीए, बीसीए, बीबीएम सीईटीसाठी संकेतस्थळावर जाहीर केलेला अभ्यासक्रम आणि माहितीपुस्तका एमबीए एकात्मिक आणि एमसीए एकात्मिक या अभ्यासक्रमांसाठीही लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले.