जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात खासगी बसमधील १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. हे सर्व जण बाजीप्रभू ढोल ताशा पथकाचे सदस्य आहेत. संबंधित पथक हे मुंबईहून पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव, सुदर्शन नगर या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ढोल ताशा वादन करण्यासाठी आले होते. ढोल ताशा वादन करून रात्री उशिरा हे पथक मुंबईच्या दिशेने रवाना झालं होतं. परंतु, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर तीव्र उतार असलेल्या ठिकाणी बस चालकाचा ताबा सुटल्याने अपघात होऊन १३ जणांचा मृत्यू झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती काल शुक्रवारी देशासह राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. लहानग्यापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी सहभागी होत जल्लोष केला. तसेच, पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव या ठिकाणी बाजीप्रभू ढोल ताशा पथक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ढोल ताशा वादन करण्यासाठी आले होते. ढोल ताशा वादन करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली. त्यानंतर ४० ते ४२ जण खासगी बसमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आज पहाटे साडेचारच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस ३०० ते ४०० फूट खोल दरीत कोसळली. यात जागीच १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २९ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, बाजीप्रभू ढोल ताशा पथकाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यांनी केलेल्या वादनाचे व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवून मृत्यू झालेल्या तरुण-तरुणींना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. गेल्या वर्षीच हे पथक निर्माण करण्यात आलं होतं, अशी माहितीदेखील समोर येत आहे. या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Manoj Chansoria and anita Chansoria
Ghatkopar Hoarding collapse: इंधनासाठी पेट्रोल पंपावर थांबले अन् तेवढ्यात होर्डिंग कोसळलं; दाम्पत्याचा मृत्यू
remaining three lanes of the Shilphata flyover are open for traffic in thane
ठाणे : शिळफाटा उड्डाणपूलाच्या उर्वरित तीन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या
Buldhana, Luxury bus, ST bus,
बुलढाणा : ‘लक्झरी’ व एसटीच्या धडकेत महिला ठार, २५ जखमी; मेहकर चिखली मार्गावरील दुर्घटना
More than five passengers died in a bus accident near Chandwad
नाशिक : चांदवडनजीक बस अपघातात पाचपेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू
mumbai nashik highway traffic jam
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी कोंडी, मुंब्रा बायपासवर अवजड वाहन उलटल्याचा परिणाम
Terrible accident on Nagpur Chandrapur highway
नागपूर-चंद्रपूर महामार्गावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत मायलेकीसह ३ ठार
Fatal Accident, Takve Village, Mumbai Pune Expressway, Accident Mumbai Pune Highway, Two Killed Three Injured Mumbai Pune Expressway, Accident Two Killed Three Injured , Mumbai pune expressway accident lonavala, accident near lonavala Mumbai pune expressway,
मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव मोटार उलटून दोघांचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी
Navi Mumbai Municipality, Palm Beach Road, Traffic Jams , sion panvel highway, Due to concretization, navi mumbai news, marathi news, road construction in navi mumbai,
काँक्रीटीकरणामुळे ‘पामबीच’वर वाहतूककोंडी

हेही वाचा – दोन गटातील वादातून लष्कर पोलीस ठाण्यात गोंधळ, पुणे कटक मंडळातील भाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा

“घडलेल्या घटनेवर आम्हाला विश्वास बसत नाही. बाजीप्रभू ढोल ताशा पथकातील सदस्य हे काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वादनासाठी आले होते. चार ते पाच तास ते आमच्या मंडळासोबत होते. अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात त्यांनी ढोल ताशा वादन केलं. मनमोकळेपणाने आमच्या सोबत राहिले, आमच्या कुटुंबाचा ते एक भाग झाले होते. असं आम्हाला काही वेळ वाटलं. आज सकाळी घडलेल्या घटनेमुळे आम्हाला धक्का बसला आहे. आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहतो”, असे मत सुदर्शन नगर भीम जयंती मंडळाचे सदस्य अरविंद कसबे यांनी व्यक्त केले.