पुण्यातील मगरपट्टा येथील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्याने महिला सहकाऱ्याला कॅबमध्येच जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना काल (गुरुवारी) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास खडकी बाजारजवळ घडली. संशयित युवकाने त्या तरूणीला चालत्या गाडीतून बाहेर ढकलून देण्याचा प्रयत्न केला.
जुबेर ख्वाजा पटेल अस मारहाण करणाऱ्या सहकाऱ्याचे नाव आहे. जुबेर ख्वाजा पटेल आणि सहकारी तरुणी हे दोघे लग्न करणार होते. मात्र तीन महिन्यांपूर्वी ते विभक्त झाले होते. तेव्हापासून दोघांचे बोलणेही बंद होते. याचाच राग जुबेर पटेलच्या मनात होता. गुरुवार (दि.१२) पहाटे कॅबमधून कंपनीकडे जात असताना पटेल याने सहकारी तरुणीकडे मोबाइलची मागणी केली. संबंधित तरुणीने मोबाइल देण्यास नकार दिला. त्यामुळे आधीपासूनच मनात राग असलेल्या जुबेरने त्या तरुणीचे केस पकडून मारहाण केली. तसेच कॅबचा दरवाजा उघडत चालत्या गाडीतून बाहेर ढकलून देण्याचा प्रयत्न केला. मात्र कॅब चालकाला ही बाब लक्षात येताच त्याने कॅब बाजूला घेतली. त्यानंतर देखील जुबेर याने तिचा गळा दाबत परत मारहाण केल्याचे खडकी पोलिसांनी सांगितले. जुबेर पटेल याला खडकी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचावर खुनाचा प्रयत्न, विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune pimpri chinchwad crime it companis youth try to push ex girlfriend outside the cab khadki bazar
First published on: 13-01-2017 at 12:51 IST