scorecardresearch

Premium

धक्कादायक! ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन कोटींचे अमली पदार्थ जप्त, गुन्हे शाखेची मोठी कारवाई

ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

pune police crime branch, sassoon hospital pune, 2 crore rupees drugs
धक्कादायक! ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन कोटींचे अमली पदार्थ जप्त, गुन्हे शाखेची मोठी कारवाई (संग्रहित छायाचित्र)

पुणे : ससून रुग्णालय परिसरात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत पोलिसांनी एका बड्या अमली पदार्थ तस्करासह तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून अमली पदार्थ विरोधी कारवाई सातत्याने करण्यात येते.

हेही वाचा : पुणे : तरुणाचा निर्घृण खून केलेल्यास जन्मठेप

Maruti Suzuki Baleno
६.६६ लाखाच्या मारुतीच्या ‘या’ ६ एअरबॅग्स असलेल्या कारसमोर सर्व पडतात फिक्या? १ लिटर पेट्रोलमध्ये धावते ३० किमी
Chandrapur, Murder Case, Friend Killed, Buried, dumping yard, five arrested,
चंद्रपूर : मित्राची हत्या करून मृतदेह कचऱ्याच्या डम्पिंग यार्डमध्ये पुरला, पाच मित्र पोलिसांच्या ताब्यात
Where are the sidewalks for walking High Court question on action against illegal hawkers
चालायला पदपथ आहेतच कुठे? बेकायदा फेरीवाल्यांवरील कारवाईवरून उच्च न्यायालयाचा प्रश्न
Karanja port first phase work
करंजा बंदराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण, सुविधा पुरविणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा

त्यातून विविध प्रकारचे अमली पदार्थ आणि कोट्यवधी रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत. मात्र ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ससून रुग्णालयात वॉर्ड क्रमांक तेरामध्ये येरवडा कारागृहातील कैद्यांना उपचारासाठी दाखल करण्यात येते. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune police crime branch seized drugs of rupees 2 crore at entry gate of sassoon hospital pune print news rbk 25 css

First published on: 01-10-2023 at 12:43 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×