scorecardresearch

पुण्यात निवृत्त कर्नलने गोळी झाडून पत्नीचा केला खून,तर स्वतः वर गोळी झाडून केली आत्महत्या

पुण्यातील मुंढवा परिसरात राहणार्‍या सेवा निवृत्त कर्नलने पत्नीची डबल बोअरच्या बंदुकीतून गोळी झाडून खून केला.

(प्रातिनिधीक छायाचित्र)

पुणे : पुण्यातील मुंढवा परिसरात राहणार्‍या सेवा निवृत्त कर्नलने पत्नीची डबल बोअरच्या बंदुकीतून गोळी झाडून खून केला.तर त्यानंतर स्वतः वर गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. निवृत्त कर्नल नारायण सिंग बोरा वय 75 आणि चंपा नारायण सिंग बोरा वय 63 अशी मयत दोघांची नावे आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत निवृत्त कर्नल नारायण सिंग बोरा यांना तीन मुले आहेत.त्यापैकी एक मुलगा वडिलांना सकाळ पासुन फोन करीत होता.पण काही प्रतिसाद मिळत नव्हता.तेव्हा मुलाने त्याच्या मित्राला फोन करून घरी जाऊन पाहण्यास सांगितले. तरी देखील कोणत्याही प्रकाराचा आत मधुन प्रतिसाद येत नव्हता. त्यानंतर दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केल्यावर निवृत्त कर्नल नारायण सिंग बोरा आणि त्यांची पत्नी चंपा नारायण सिंग बोरा यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. तर मृतदेहच्या बाजूला डबल बोअरची बंदूक देखील होती.त्यामुळे यातुन सुरुवातीला पतीने पत्नीचा खून केला आणि त्यानंतर स्वतः वर गोळी झाडून घेतल्याच प्रथम दर्शनी दिसून येत आहे. तसेच या घटने मागील कारण अद्याप पर्यंत समजू शकले नसल्याचे मुंढवा पोलिसांनी सांगितले.तसेच या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune retired colonel shot killed wife shot himself police crime ysh

ताज्या बातम्या