scorecardresearch

पुणे : बनावट दस्तऐवजाद्वारे व्यावसायिकाच्या बंगल्याची विक्री ; दलालासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा

बंगला खरेदीच्या बहाण्याने व्यावसायिकाकडून कागदपत्रे घेऊन परस्पर त्यांच्या बंगल्याची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे : बनावट दस्तऐवजाद्वारे व्यावसायिकाच्या बंगल्याची विक्री ; दलालासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा
( संग्रहित छायचित्र )

बंगला खरेदीच्या बहाण्याने व्यावसायिकाकडून कागदपत्रे घेऊन परस्पर त्यांच्या बंगल्याची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बंगल्यावर दोन कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात आले. या प्रकरणी वानवडी पोलिसांकडून जमीन खरेदी विक्री करणाऱ्या दलालासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – धावत्या रेल्वेत तरुणीवर लैंगिक अत्याचार, मावस भावाला दहा वर्षांची सक्तमजुरी

या प्रकरणी गजेंद्र संचेती, गीतेश संचेती, सुनिल भुजबळ, जितेंद्र जैस्वाल, त्रेजा गिल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत ६२ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. घोरपडी भागात व्यावसायिकाच्या मालकीचे दोन बंगले आहेत. बंगला खरेदी करण्याच्या बहाणा आरोपींनी केला. बंगला खरेदीसाठी कर्ज काढायचे असल्याचे सांगून व्यावसायिकाकडून त्यांनी बंगल्याची कागदपत्रे घेतली. संचेती यांनी मुंबईतील एका बँककडे बंगल्याची कागदपत्रे सादर करुन दोन कोटी रुपयांचे कर्ज काढले.

हेही वाचा – धावत्या रेल्वेत तरुणीवर लैंगिक अत्याचार, मावस भावाला दहा वर्षांची सक्तमजुरी

त्यानंतर आरोपींनी संगनमत करुन आधारकार्ड, पॅनकार्डमध्ये फेरफार करुन बनावट दस्तऐवज तयार केला. आरोपींनी मालमत्ता तसेच वीजबिलावर स्वत:चे नाव लावले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने फिर्याद दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठीतील सर्व पुणे न्यूज ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune sale of businessman bungalow through forged documents pune print news amy

ताज्या बातम्या