scorecardresearch

Premium

पुणे : देहू संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम मोरे; अटीतटीच्या लढतीत उमेश मोरेंचा केला नऊ मतांनी पराभव

जगदगुरू संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत पुरुषोत्तम दत्तात्रय मोरेंनी उमेश मोरेंचा अवघ्या नऊ मतांनी पराभव केला. नितीन महाराज मोरेंचा कार्यकाळ संपल्याने ही निवडणूक प्रक्रिया रविवारी पार पडली.

Tukaram Maharaj Sansthan Dehu
छायाचित्रात डावीकडे पराभूत उमेदवार उमेश मोरे तर उजवीकडे विजयी उमेदवार पुरुषोत्तम मोरे (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

पुणे : जगदगुरू संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम मोरे यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत पुरुषोत्तम दत्तात्रय मोरेंनी उमेश मोरेंचा अवघ्या नऊ मतांनी पराभव केला. नितीन महाराज मोरेंचा कार्यकाळ संपल्याने ही निवडणूक प्रक्रिया रविवारी पार पडली.

पुण्यातील देहूच्या जगदगुरू संत तुकाराम महाराज संस्थानला पुरुषोत्तम मोरे हे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून लाभले. मावळते अध्यक्ष नितीन महाराज मोरेंचा कार्यकाळ संपल्याने रविवारी २६ मार्चला नवा अध्यक्ष निवडण्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी पुरुषोत्तम दत्तात्रय मोरे आणि उमेश सुरेश मोरे हे दोन उमेदवार रिंगणात होते. या दोघांपैकी कोण अध्यक्ष होणार, याकडे वारकरी संप्रदायाचे लक्ष लागले होते. रविवार २६ मार्चच्या सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मतदान झाले. तर पुढच्या काही तासांत नवनिर्वाचित अध्यक्ष कोण हे स्पष्ट झाले. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पित्ती धर्मशाळेत पार पडली.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान

हेही वाचा – लोणावळ्यात डाॅक्टरच्या बंगल्यात चोरी; पाच लाखांचा मुद्देमाल लंपास

हेही वाचा – पुणे : नदी पात्रातील झाडांची कत्तल होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्याने झाडावर बसून केला विरोध

जगदगुरू संत तुकाराम महाराज देवस्थानवर यावेळी अध्यक्षपदाची संधी ही गणेशबुवा शाखा दोनला होती. या अध्यक्षाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे. आबाजीबुवा शाखा न.१ मध्ये (९२) गणेशबुवा शाखा न.२ (१४०) आणि गोबिंदबुवा शाखा न.३ (१४०) असे एकूण ३७२ मतदार होते. त्यापैकी ३२२ जणांनी मतदान प्रक्रियेत भाग घेऊन मतदान केले. नवनिर्वाचित अध्यक्ष पुरुषोत्तम दत्तात्रय मोरे यांना १६४, तर उमेश मोरेंना १५५ मते मिळालीत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 14:14 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×