scorecardresearch

Premium

लोणावळ्यात डाॅक्टरच्या बंगल्यात चोरी; पाच लाखांचा मुद्देमाल लंपास

लोणावळा परिसरात एका डाॅक्टरच्या बंगल्यात चोरी झाली आहे. बंगल्यातून पाच लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

theft doctor bungalow Lonavala
लोणावळ्यात डाॅक्टरच्या बंगल्यात चोरी (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

लोणावळा : लोणावळा परिसरात एका डाॅक्टरच्या बंगल्यातून चोरट्यांनी पाच लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत डाॅ. किरण राघवेंद्र चुळकी (वय ४४, रा. विजयपूर, कर्नाटक) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ‘या’ चार शहरांची चर्चा! २३ एप्रिलला एक ठिकाण होणार निश्चित

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

हेही वाचा – “तुमची ५२ काय १५२ कुळं खाली उतरली, तरी…”, उद्धव ठाकरेंच्या विधानावर बावनकुळेंचा पलटवार; म्हणाले…

डाॅ. किरण चुळकी यांचा लोणावळ्यातील अंबरवाडी गणेश मंदिराजवळ असलेल्या हनीकोम्ब व्हिला परिसरात बंगाल आहे. डाॅ. चुळकी आणि त्यांचे मित्र दोन दिवसांपूर्वी लोणावळ्यात आले होते. रविवारी मध्यरात्री चोरटे बंगल्यात शिरले. चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या दरवाज्यातून प्रवेश केला. चोरट्यांनी लॅपटाॅप, पाच महागडे मोबाइल संच, डेबिट कार्ड, रोकड असा पाच लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला.
डाॅ. चुळकी यांच्या बंगल्यात चोरी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून, पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुजावर तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Theft at doctor bungalow in lonavala five lakhs worth of goods stolen pune print news rbk 25 ssb

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×