राज्य सरकारने जादूटोणाविरोधी कायद्याखाली ‘राधे माँ’वर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शुक्रवारी केली.
जादूटोणाविरोधी कायद्यातील कलम ५ प्रमाणे आपल्या अंगात अतिंद्रिय शक्ती असल्याचे भासवून किंवा एखाद्या व्यक्तीत अतिंद्रिय शक्ती संचारली असल्याचा आभास निर्माण करून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे किंवा त्या व्यक्तीचे सांगणे न ऐकल्यास वाईट परिणाम होतील अशी इतरांना धमकी देणे आणि फसविणे किंवा ठकवणे हा गुन्हा आहे. त्यानुसार निकी गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीची आणि राधे माँच्या एकूण आध्यात्मिक दरबाराची पोलिसांनी कसून चौकशी करावी, अशी मागणी अंनिसचे राज्य कार्यवाह मिलिंद देशमुख आणि डॉ. हमीद दाभोलकर यांनी शुक्रवारी केली.