पिंपरी-चिंचवडमध्ये पाऊस

दिवसभर ढगाळ राहणारे हवामान, आकाशात दाटून आलेले मळभ, त्रासदायक ठरणारा उकाडा आणि पाऊस पडणार असे वाटत असतानाच त्याने दिलेली हुलकावणी याचा अनुभव पुण्याच्या अनेक भागात नागरिकांनी घेतला. पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र जोराच्या पावसाच्या सरी पडून गेल्या. जिल्ह्य़ाच्या भागात- मुळशी, मावळ, जुन्नर आणि खेड तालुक्यातही पाऊस झाला आहे.

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात

‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’ने (आयएमडी) पुणे आणि परिसरासाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार बुधवारीही गडगडाटी ढग निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर देखील हवामान ढगाळच राहणार असून रविवारी व सोमवारी काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मंगळवारी सकाळपासूनच हवामान ढगाळ होते, परंतु दुपारचे ऊनही भाजून काढणारे होते. पुण्यात मंगळवारी ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून रात्रीचे तापमानही २५ अंश होते. त्यामुळे दिवसा आणि रात्रीही प्रचंड उकडते आहे. बुधवारीही दिवसाचे तापमान ४० अंशांवरच राहण्याची शक्यता आहे, परंतु त्यानंतर तापमानात घट होईल, असे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र अनेक भागात मंगळवारी संध्याकाळी पावसाच्या सरींनी हजेरी दिली. अचानक आलेल्या जोराच्या पावसामुळे पादचारी आणि वाहनचालकांची तारांबळ उडाली, तसेच काही काळ चौकांमध्ये वाहतूक कोंडीही झाली. पुण्याच्या आसपासच्या तालुक्यांमध्येही पाऊस झाला आहे.