पिंपरी पालिकेच्या गट ब आणि क संवर्गाच्या ऑनलाइन भरतीच्या सर्व टप्प्यांचे कामकाज खासगी कंपनीकडे देण्याचा निर्णय पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला आहे. यासाठी होणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचा >>> पुणे : बाणेर रस्त्यावरील बंगल्यात चोरी ; अडीच लाखांचा ऐवज लंपास

पालिकेच्या ब आणि क संवर्गातील एकूण १६ अभिनामाच्या पदनामांची एकूण ३८६ पदे रिक्त आहेत. ही पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून पालिकेच्या वतीने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. या ऑनलाइन भरतीचे कामकाज ‘टी.सी.एस’ कंपनीस देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, त्यास मान्यता देण्यात आली आहे. पालिकेला प्राप्त होणाऱ्या उमेदवारांच्या अर्जानुसार प्रती उमेदवार कंपनीला ५७० रुपये आणि होणाऱ्या प्रत्यक्ष खर्चास प्रशासकांनी मान्यता दिली आहे.