पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या ४० उमेदवारांपैकी ३३ उमेदवारांची उमेदवारी वैध ठरली आहे. आम आदमी पार्टीचे (आप) मनोहर पाटील यांच्यासह सात उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.

पाटील यांनी उमेदवारी अर्ज अपूर्ण भरला; तसेच एबी अर्जापैकी बी अर्ज अपूर्ण भरल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे.

33 candidatures filed in Satara including Udayanraje bhosle and Shashikant Shinde
साताऱ्यात उदयनराजे, शशिकांत शिंदेसह ३३ उमेदवारी अर्ज दाखल
sharad pawar group candidate list,
शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; रावेरमधून श्रीराम पाटील, तर साताऱ्यातून…
dharashiv, daughter in law of padmasinha patil
धाराशिवमध्ये अर्चना पाटील महायुतीच्या उमेदवार; मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश, तटकरेंकडून उमेदवारीची घोषणा
eknath shinde
ठाणे, नाशिक, यवतमाळचा तिढा कायम; शिंदे गटाची पहिली यादी जाहीर

भाजपच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप यांचा अर्ज वैध ठरला असून बदली उमेदवार (डमी) शंकर जगताप यांची उमेदवारी अवैध ठरली आहे. (मुख्य उमेदवार पात्र असल्याने बदली उमेदवारी अवैध) राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल (नाना) काटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलेले राहुल कलाटे यांचे अर्ज वैध ठरले आहेत. इतर राजकीय पक्षांपैकी बहुजन भारत पार्टीचे तुषार लोंढे, संभाजी ब्रिगेडचे प्रविण कदम यांसह इतर २६ अपक्षांचे अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी माघारीची मुदत शुक्रवारपर्यंत आहे.

हेही वाचा >>> पुणे : कोयता गँगला रोखण्यासाठी प्रशिक्षित पोलिसांची खास तुकडी, हाती ‘काठी’ ऐवजी पिस्तूल!

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाननी प्रक्रिया बुधवारी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी वैध, अवैध उमेदवारी अर्जांची घोषणा या वेळी केली. निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण, निवडणूक पोलीस निरीक्षक अनिल यादव यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या छाननी प्रक्रियेवेळी उमेदवारी अर्ज दाखल करणारे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यांचे अर्ज अवैध (कारणांसह)

आम आदमी पार्टीचे मनोहर पाटील यांनी उमेदवारी अर्ज अपूर्ण भरला, तसेच एबी अर्जापैकी बी अर्ज अपूर्ण भरला.

अपक्ष उमेदवार चेतन ढोरे यांनी उमेदवारी अर्जासोबत अपूर्ण प्रतिज्ञापत्र सादर केले.

अपक्ष उमेदवार गणेश जोशी यांनी उमेदवारी अर्जात पुरेशा सुचकांची स्वाक्षरी सादर केली नाही.

अपक्ष उमेश म्हेत्रे यांनी उमेदवारी अर्जात आवश्यक असणारी चिंचवड विधानसभा मतदार संघातील सुचकांची नावे दिली नाहीत.

चिंचवड पोटनिवडणूक उमेदवारी अर्जांचा आढावा

एकूण उमेदवार ४०

वैध उमेदवार ३३

अवैध उमेदवार ७

राष्ट्रीयकृत पक्षांच्या उमेदवारांची संख्या २

नोंदणीकृत पक्षांचे उमेदवार ५

अपक्ष उमेदवार २६