दत्ता जाधव

पुणे : उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, जंगलांना लागलेल्या आगी आदी नैसर्गिक आपत्तींमुळे जगभरात दुधाच्या उत्पादनात घटीचा कल आहे. त्यामुळे जगभरात दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या दरात तेजी आहे. जागतिक परिस्थितीसह स्थानिक घडामोडींमुळे भारतातही दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या दरात तेजीचा कल कायम आहे.

sea level rise
समुद्र वाढता वाढता वाढे; आपल्या आयुष्यावर काय परिणाम?
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
wheat India wheat production estimated at 1120 lakh tonnes this year
यंदा गव्हाचे उच्चांकी उत्पादन? तापमान वाढीची झळ कमी; ११२० लाख टन उत्पादनाचा अंदाज

अमेरिकेच्या कृषी विभागाने या बाबतचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, युरोपियन युनियन, न्यूझीलंड आणि अमेरिका हे दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचे प्रमुख जागतिक निर्यातदार देश आहेत. यापैकी फक्त अर्जेटिनामध्ये दूध संकलनात किरकोळ एका टक्क्याने वाढ आहे. अन्य देशांत नैसर्गिक आपत्तींमुळे दूध उत्पादनात घट झालेली आहे. ऑस्ट्रेलियातील दूध उत्पादन तीन टक्क्यांनी, युरोपियन युनियनचे उत्पादन दोन टक्क्यांनी, न्यूझीलंडचे उत्पादन एक टक्क्यांनी घटले आहे.

करोनाकाळात दुग्ध व्यवसायाचे मोठे नुकसान झाल्यामुळे अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायातून बाहेर पडले आहेत. गाईच्या मांसाच्या (बीफ) दरात वाढ झाल्यामुळे दूध देणाऱ्या गाईंचीही मांसासाठी कत्तल झाली. त्यामुळे दूध देणाऱ्या गाईच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गाईंच्या गोठय़ात काम करणाऱ्या मजुरांची संख्या घटत चालली आहे. गोठय़ात काम करण्यास मजूर मिळत नाहीत, त्यामुळे मजुरीवरील खर्च वाढला आहे. दुष्काळ, उष्णतेच्या लाटांमुळे हिरव्या आणि पोषक चाऱ्यांची उपलब्धता कमी झाली आहे. अन्नधान्यांच्या किमतीत जगभरात वाढ झाल्यामुळे पशूखाद्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. या सर्वाचा परिणाम दूध उत्पादनावर दिसून येत आहे.

जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत

करोना काळात दुग्धजन्य पदार्थाची जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. ती अद्याप सुरळीत झालेली नाही. चीझ निर्यातीत ऑस्ट्रेलिया, बेलारूस, युरोपियन युनियन, न्यूझीलंड आणि अमेरिका हे आघाडीवरील देश आहेत. जागतिक बाजारातील न्यूझीलंडचा वाटा पाच टक्क्यांनी घटला आहे. बटरच्या दरात तेजी असल्यामुळे बेलारुस, युरोपियन युनियन, न्यूझीलंड आणि अमेरिका या प्रमुख निर्यातदार देशांनी बटरच्या उत्पादनावर भर दिला आहे. इतर देशांनी दोन टक्क्यांनी तर अमेरिकेने आठ टक्क्यांनी बटरच्या उत्पादनात वाढ केली आहे.

दूध पावडरची जागतिक बाजारात टंचाई

जागतिक बाजारात दूध पावडरची टंचाई निर्माण झाली आहे. स्निग्धांश नसलेल्या दूध पावडरच्या उत्पादनात ऑस्ट्रेलियाने चार टक्क्यांनी, युरोपियन युनियनने अकरा टक्क्यांनी आणि अमेरिकेने एका टक्क्याने कपात केली आहे. तर स्निग्धांश असलेल्या दूध पावडरच्या उत्पादनात युरोपियन युनियनने तेरा टक्क्यांनी आणि न्यूझीलंडने नऊ टक्क्यांनी कपात केली आहे. याचा परिणाम म्हणून जागतिक बाजारात दूध पावडरच्या दरात तेजी आहे.

सर्वाधिक गाई भारतात; उत्पादनात मात्र पिछाडी

अमेरिकेच्या कृषी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगात एकूण सुमारे १ अब्ज ९ लाख ६७ हजार गाई आहेत. गाईपैकी ३०.५२ टक्के म्हणजे सुमारे ३० कोटी ५५ लाख गाई एकटय़ा भारतात आहेत. पण, दूध उत्पादनात भारताचा क्रमांक शेवटी लागतो. जागतिक दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या बाजारात भारताची दखलही घेतली जात नाही. देशात तयार होणारी दूध पावडर, चीझ, बटर आदी उत्पादने बांगलादेश, श्रीलंका आणि आखाती देशांना निर्यात होतात. युरोपियन बाजारपेठेत अद्यापही आपल्याला शिरकाव करता आलेला नाही. दर्जा आणि किमतीच्या बाबत देशातील उत्पादने जागतिक बाजारात टिकू शकत नाहीत.

जागतिक बाजारात बटरचे दर ४०० ते ४१० रुपये आणि दूध पावडरचे दर २८० ते २९० रुपये प्रति किलो आहेत. त्यामुळे राज्यातील दुग्ध व्यावसायिक बटर आणि दूध पावडरच्या निर्मितीवर भर देत आहेत. परिणामी बाजारात दुधाची उपलब्धता थोडी कमी झाली आहे. त्यामुळे दूध विक्री दरात सरासरी दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

– प्रकाश कुतवळ, दूध उद्योगाचे अभ्यासक