scorecardresearch

पुणे: रितेश कुमार यांच्याकडे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे; मावळेत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून पदभार

रितेश कुमार भारतीय पोलीस सेवेच्या १९९२ च्या तुकडीतील अधिकारी आहेत.

पुणे: रितेश कुमार यांच्याकडे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे; मावळेत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून पदभार
रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून पदभार स्विकारला.

नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी सायंकाळी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रितेश कुमार यांची गृहविभागाने पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून पदभार स्विकारला.

हेही वाचा >>> पुणे: लेफ्टनंट कर्नल पुरोहितांवरील पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी

गुप्ता यांची गृहविभागाने राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली. रितेश कुमार भारतीय पोलीस सेवेच्या १९९२ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. शहरातील गुंडगिरी, वाहतूक समस्या, सायबर गुन्ह्यांसह गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्याचे आव्हान पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासमोर आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार शनिवारी (१७ डिसेंबर) वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीत शहरातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच गंभीर गुन्ह्यांचा तपासाबाबतची माहिती ते घेणार आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-12-2022 at 21:57 IST

संबंधित बातम्या