Premium

पुणे : दूध दरवाढीच्या मागणीसाठी पुण्यात सदाभाऊ खोत यांचा कावड मोर्चा

मोर्चात दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते. राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली.

Sadabhau Khot Kavad Morcha pune
पुणे : दूध दरवाढीच्या मागणीसाठी पुण्यात सदाभाऊ खोत यांचा कावड मोर्चा (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला ४० आणि म्हशीच्या दुधाला ८० रुपये दर मिळाला पाहिजे, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी पुण्यातील लाल महाल ते कुमठेकर रोडवरील दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयावर कावड मोर्चा काढला. या मोर्चात दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते. राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘आळंदी बंद’ अखेर मागे, ग्रामस्थांचा मोर्चा; “वारकऱ्यांना वेठीस धरणे योग्य नाही” – नवनिर्वाचित विश्वस्त राजेंद्र उमाप

हेही वाचा – मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे राजीनामा देण्याच्या तयारीत?

यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, या वर्षी राज्यात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गासमोर पाण्याच संकट निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध माध्यमांतून राज्य सरकारने शेतकर्‍यांना मदत केली पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकर्‍यांना दूध उत्पादनामधून काही उत्पन्न मिळण्यास मदत होते. मात्र मागील काही वर्षांत दुधाच्या दरात कोणत्याही प्रकारची दरवाढ झाली नाही. यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असून गाईच्या दुधाला ४० आणि म्हशीच्या दुधाला ८० रुपये दर द्यावा, अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे करीत आहे. आमच्या मागण्यांसाठी पुण्यात मोर्चा काढला असून आमच्या मागण्यांची दखल राज्य सरकारने न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sadabhau khot kavad morcha in pune to demand milk price hike svk 88 ssb

First published on: 05-12-2023 at 15:14 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा