साहित्य संमेलन भरवणं ही नस्ती उठाठेव असून संमेलनावर चर्चा करणं हा वेळेचा अपव्यय आहे, अशी टीका ‘हिंदू’ व ‘कोसला’कार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी शुक्रवारी केली. या संमेलातून  निव्वळ चर्चा होते, मात्र त्याबाबत पुढे काहीच होत नसल्याचेही मत त्यांनी यावेळी नोंदविले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी संमेलनाच्या विरोधाचा सुर आळवला.
अग्रलेख: साहित्यिकांचे गप घुमान..
शहाणपणाला मर्यादा असते पण मूर्खपणाची काही हद्द नसते असे सांगत संमेलन भरवणं हे रिकाम्या लोकांचे उद्योग आहेत, असेही नेमाडे म्हणाले. तसेच या संमेलनासाठी राजकारण्याकडून पैसा घेण्यात येतो. उद्या शत्रूकडूनही पैसे आणतील अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली. ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संत नामदेव यांच्या कर्मभूमीत पार पडणार असून त्या पार्श्वभूमीवरच नेमाडेंनी केलेल्या टीकेमुळे  नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahitya sammelan is waste of time says bhalchandra nemade
First published on: 28-11-2014 at 01:56 IST