प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असलेल्या ‘सैराट’ या चित्रपटाची पायरसी करणाऱया एका तरुणावर स्वारगेट पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. कासम दस्तगीर शेख(२३) या तरुणाचे स्वारगेट परिसरात मोबाईल दुरूस्तीचे दुकान आहे. कासमच्या दुकानातून चित्रपटाची पायरसी होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी दुकानावर छापा टाकला. बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी कासम शेख याला रंगेहाथ पकडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सैराट’ची मूळ प्रिंट लीक, नागराज मंजुळेंची पोलिसांकडे तक्रार 

कासम शेख केवळ १०० रुपयांत ‘सैराट’ चित्रपटाची प्रिंट ‘पेन ड्राईव्ह’वर ट्रान्सफर करून दिली. याप्रकरणी पोलिसांनी कासम शेखविरोधात परवानगी नसतानाही चित्रपटाची कॉपी बाळगणे आणि तिचा प्रसार करणे याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच त्याच्याजवळील साहित्य देखील जप्त करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sairat film piracy in pune police case registered
First published on: 05-05-2016 at 08:11 IST